Super Bowl अमेरिकेतील एक प्रचंड लोकप्रिय आणि दरवर्षी साजरा केला जाणारा सण .. हो खरंच सणच म्हणेन कारण या खेळाचा जो काही तामझाम इथल्या घराघरात असतो तो काही औरच! अमेरिकेतील National Football League च्या शेवटच्या खेळाला (Final) super bowl म्हणतात.
माझी आणि या सणाची ओळख जरा उशिराच झाली. एकतर मला अमेरिकेन फुटबॉल या खेळाची मूळ संकल्पनाच मान्य नाही. म्हणजे हातात बॉल घेऊन धावायच्या खेळाला फुटबॉल का बरं म्हणत असतील हे आजही मला न उलगडलेलं कोडं आहे. असो…
तर माझी आणि या खेळाची खरी ओळख माझा मुलगा अगस्त्य जेंव्हा ५-६ वर्षाचा झाला तेंव्हा झाली. म्हणजे मी आणि माझा नवरा बिलकुल स्पोर्ट फॅन नाही आणि त्यातूनही आमचे पाहण्याचे स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेट आणि टेनिस .. अमेरिकन फूटबॉल ची इथे येईपर्यंत concept सुद्धा माहित नव्हती.. पण अगस्त्य प्रचंड स्पोर्ट्स फॅन आहे. आमच्या घरात हा कसा काय sports fan निपजला याचं कधी कधी आश्चर्य वाटत. त्याच्या हट्टामुळे आम्ही पण दरवर्षी थोड्या फार प्रमाणात घरच्या घरी हा सण साजरा करू लागलो. पण तरीही पहिली काही वर्षे हा खेळ समजून घेण्यात आणि याच्यात एवढं celebrate करण्यासारखं काय आहे या curiosity मध्ये गेली. मग हळू हळू half time show बद्दल इंटरेस्ट वाटू लागला.
मी GM मध्ये नोकरी करत असताना २ वर्ष मला या खेळा दरम्यान Online website support project manager म्हणून काम करावं लागलं. म्हणजे मोठ्या मोठ्या ब्रॅण्ड च्या advertisements या खेळाच्या मध्ये लावल्या जातात आणि त्या बघून त्या ब्रँड च्या website visits काही पटीने वाढतात. तर खेळा दरम्यान हि website सुरळीत चालू ठेवणे हे माझ आणि माझ्या team चं काम होतं. त्या दोन वर्षात जबरदस्तीनेच काम करता करता खेळ बघायला लागला आणि थोडा जास्त समजायला लागला.
तरीही अजून मला हा खेळ पूर्ण समजलेला नाही आणि खेळ चालू असताना अनेक प्रश्न विचारून मी अगस्त्य ला वेड करतच असते.
तर माझ्या एकंदर निरीक्षणावरून super bowl बघणाऱ्या सर्वसामान्य लोकांना ३ प्रकारात विभागता येईल.
१. The Real Fans : हे खरे फुटबॉल किंवा final ला खेळणाऱ्या टीम्स चे फॅन असतात.. अगदी त्यांच्या आवडत्या टीम ची jersey घालून टीव्ही स्क्रीन समोर याचा सण साजरा होतो.. बाकी २ प्रकारात मोडणाऱ्या लोकांशी बोलण्यात त्यांना फारसा काहीही interest नसतो. किंबहुना त्या प्रकारातले लोक खेळ चालू असता जितके लांब असतील तेवढेच चांगले अशी त्यांची इच्छा असते..
२. The Party Fans : हे लोक फुटबॉल मध्ये कमी आणि पार्टी मध्ये जास्त interested असतात. super bowl च्या निमित्ताने कोणाच्या तरी घरी जाऊन किंवा कोणाला तरी घरी बोलावून पार्टी करण्यात आणि त्या बरोबर च्या खाण्यात आणि “पिण्यात” त्यांना जास्त इंटरेस्ट असतो … त्या गप्पामधून मग खेळ मध्ये मध्ये बघायचा.. पण या लोकांना खेळ समजत असावा किंवा पार्टी मधून आपल्याला वगळतील या भीतीने तसं दाखवत असावेत (FOMO: Fear of missing out)..
३. The Halftime Fans : हे सगळे बाकीचे फॅन्स ज्यांना खेळात किंवा त्याच्या सोहळयात फारसा काहीही इंटरेस्ट नसतो पण खेळादरम्यान लागणाऱ्या ads आणि halftime show या करमणुकीच्या कार्यक्रमांची उत्सुकता त्यांना असते. बाकी कोणी touchdown केला आणि कोणी foul केला यात त्यांना फारसा काहीही रस नसतो. काहीतरी छान बनवावं किंवा ऑर्डर करावं आणि टीव्ही समोर बसून संध्याकाळ enjoy करावी एवढाच त्यांचा माफक उद्देश असतो. या लोकांना FOMO वगैरे चा काही फरक पडत नाही. उगीच ज्या गावाला जायचा नाही त्याच्या साठी GPS कशाला लावायचा ?
तर जे लोक या वरच्या दोन प्रकारात मोडतात त्यांचा तिसऱ्या प्रकाराला त्यांच्या super bowl evening पासून लांब ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू असतो. कारण एकतर # ३ ना खेळातल विशेष काही कळत नाही आणि ते फारसा ते कळवून घेण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत. अगदीच ते प्रयत्न करू लागले तर १०० प्रश्न विचारून खेळ पाहण्याची मजा घालवतात त्यामुळे त्यांना लांब ठेवणं कधीही चांगलं नाही का?
मी पूर्णपणे आणि काही प्रमाणात अमोल सुद्धा तिसऱ्या प्रकारात मोडत असल्यामुळे आम्ही फारसे कधी या संध्याकाळी घराबाहेर प्रकार १ किंवा २ यांच्याबरोबर नसतो किंवा मित्रमंडळींना नको असतो… मग आमचं आम्हीच काहीतरी आवडीचं बनवतो आणि अगस्त्य ला game बघायला सोबत म्हणून आवडीने खातो… तर २०२१ च्या Super bowl LV चा सुपर मेनू होता – Chicken Enchilada with Boom Boom Sauce Bruschetta with spinach and artichoke dip